१.मूल्यमापनाचे
संख्यात्मक साधने प्रक्रार:
१.लेखी परीक्षा (प्रचलित परीक्षा पध्दती) २.तोंडी परीक्षा. ३.प्रात्यक्षिक परीक्षा.
१.लेखी
परीक्षा वैशिष्टे व मर्यादा:
लेखी परीक्षा वैशिष्टे : १.परीक्षा मध्ये विश्वाससनियता व सहप्रमाणता जास्त असते. २.उद्दिष्टे ,अध्ययन अनुभव व आशय या तिन्ही घटकाचा विचार करून परीक्षेचे नियोजन करता येते. ३.उत्तर पत्रिकांच्या रूपाने विद्यार्थानकडून मिळालेला पुरावा बराच काळ जपून ठेवता येतो . ४.अनेक विद्यार्थी ठराविक वेळात चाचणी पूर्ण करतात व उत्तर तपासतांना उत्तर सूची मिळते म्हणून यात वस्तुनिष्ठता वाढते. लेखी परीक्षा मर्यादा : १.लेखी परीक्षा फक्त माहितीचे मापन होते. २.लेखी परीक्षेत परीक्षकाला प्रश्नाचा चटकन प्रतिसाद मिळत नाही व विद्यार्थांना सतत तीन तास लेखन करावे लागते ते कंटाळतात. ३.लेखन कौशल्यचाच विकास होतो. ४.हाताने अपंग असणाऱ्या मुलासाठी ही परीक्षा उपयुक्त नाही. लेखी परीक्षा सुधारणा : १.प्रश्न पत्रिकेत तीन प्रकारचे प्रश्न असावे.वस्तुनिष्ठ,लघुत्तरी,दिर्घोत्तरी प्रश्न. २.सोपे व कठीण प्रश्न समान असावे. ३.आजकाल पेपर तपासण्यात सुद्धा सुधारणा होत आहेत.
२.तोंडी
परीक्षा:
तोंडी परीक्षा वैशिष्टे : १.तोंडी परीक्षेत विद्यार्थांचे रसग्रहण शक्ती ,तर्कशक्ती ,निर्णयशक्ती याचे मापन करता येते. २.तोंडी परीक्षेत परीक्षकाला प्रश्नाचे उत्तरे चटकन मिळतात. ३.विद्यार्थांचे लेखन कौशल्य सोडून श्रवण,भाषण ,वाचन कौशल्याचा विकास पाहता येतो. ४.हाताने अपंग असणाऱ्या विद्यार्थांसाठी ही परीक्षा उपयुक्त आहे.
तोंडी
परीक्षा मर्यादा :
१.सगळ्यांना सारखे प्रश्न विचारले जात नाहीत त्यामुळे यात विश्वससनियता व सप्रमाता कमी असते. २.परीक्षेचे पूर्वनियोजन नसेल तर परीक्षा आत्मनिष्ठ बनते. ३.विद्यार्थांने दिलेल्या प्रश्नाचा पुरावा शिक्षकांजवळ नसतो. ४.एका वेळा एकच विद्यार्थांची परीक्षा घेता येते त्यामुळे खूप वेळा लागतो.
तोंडी
परीक्षा सुधारणा :
१.सर्व प्रश्नाची उत्तरे आधीच तयार करून ठेवावे. २.सोपे व कठीण प्रश्न समान असावे. ३.जो वर्तन बदल लेखी परीक्षेतून होत नाही तो तोंडी परीक्षेद्वारे करून घ्यावे.
३.प्रात्यक्षिक
परीक्षा :
प्रात्यक्षिक परीक्षा वैशिष्टे : १.विद्यार्थांना कृती करावी लागते म्हणून त्याचा क्रियात्मक विकास होतो. २.प्रश्नाचे उत्तर कृतीतून द्यावे लागते उदा-गायन,वादन,नृत्य,चित्रकला. ३.ज्याला आपल्या भावना भाषेद्वारे व्यक्त करता येत नाही त्यासाठी ही परीक्षा कृती द्वारे घेतात. ४.मुक्या व बहिऱ्या विद्यार्थांसाठी ही परीक्षा अधिक उपयुक्त आहे. प्रात्यक्षिक परीक्षा मर्यादा : १.विद्यार्थांचा ज्ञानात्मक,भावात्मक,उद्दिष्टाचे मापन होत नाही. २.विद्यार्थी कृतीचा क्रम लावून विद्यार्थी कौशल्याच्या ठेवून विद्यार्थांच्या कृतीचे निरीक्षण करावे लागते व अपूर्ण निरीक्षणामुळे चुकीचे मूल्यमापन होण्याची शक्यता असते. ३.ही परीक्षा कृतीद्वारे घेतली जाते म्हणून साहित्य व साधनाची जमवाजमव करावी लागते यासाठी वेळ ,खर्च खूप लागतात. ४.या परीक्षेत व्यक्तिनिष्ठता खूप येण्याची शक्यता अधिक आहे.
प्रात्यक्षिक
परीक्षा सुधारणा :
१.विद्यार्थांच्या कृतीचा क्रम लावून कौशल्याच्या नोंदी ठेवून वस्तुनिष्ठ निरीक्षण करावे. २.अनेक साधनाची जमवाजमव परीक्षेच्या आधीच करून घ्यावी . ३.आदर्श कृतीचे वैशिष्टे आधीच ठरवून घ्यावे . |
२.परीक्षेच्या नियोजनाची आवश्यकता: १.आशयाचे सखोल ज्ञान. २.उद्दिष्टाच्या स्पष्टीकरणाचे ज्ञान मिळते. ३.बौद्धिक स्तर. ४.प्रश्न पत्रिका तयार करणे. ५.महात्वांश . |
३.संविधान
तक्ता व त्याची आवश्यकता:
संविधान तक्ता: प्रश्न पत्रिकेच्या त्रिमिती आराखडा ,उद्दिष्टानुसार महत्वांश,आशयानुसार महत्वांश,प्रश्न प्रकारानुसार महत्वांश ह्या प्रश्न पत्रिकेच्या त्रिमिती आराखड्यास संविधान तक्ता म्हणतात. संविधान तक्ता आवश्यकता: १.संविधान तक्ता केल्यामुळे मूल्यमापन उद्दिष्टां नुसार होते. २.आशयातील सर्व घटकांना योग्य महत्व दिले जाते. ३.संविधान तक्तामुळे प्रश्नाची विविधता येते. ४.पाठ्यांशाच्या सर्व भागाचे अध्ययन करण्यावर विद्यार्थी भर देतात.
संविधान
तक्ता आवश्यकता:
१.उपघटक : मुद्दे व उप मुद्दे. २.ज्ञान:निबंधवजा प्रश्न,लघुत्तरी प्रश्न,वस्तुनिष्ठ प्रश्न. ३.आकलन: निबंधवजा प्रश्न,लघुत्तरी प्रश्न,वस्तुनिष्ठ प्रश्न. ४.उपयोजन : निबंधवजा प्रश्न,लघुत्तरी प्रश्न,वस्तुनिष्ठ प्रश्न. ४.कौशल्य: निबंधवजा प्रश्न,लघुत्तरी प्रश्न,वस्तुनिष्ठ प्रश्न. |
४.प्रश्नांचे प्रकार :
१.निबंध वजा किंवा दीर्घोत्तरी प्रश्न : २.लघुत्तरी प्रश्न ३.वस्तुनिष्ठ प्रश्न : १.प्रत्यावाहानात्मक प्रश्न (आठवणे):-रिकाम्या जागा भरा व एका वाक्यात उत्तरे द्या. २.प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न (ओळखणे) १.व्दिपर्यायी प्रश्न. २.बहु पर्यायीपश्न. ३.जोड्या लावा. ४.सूचीनुसार जोड्या लावा. ५.अर्थाविष्कार करणारे प्रश्न : विद्यार्थांची आकलन क्षमता अजमाण्यासाठी अर्थविष्कार करणारे प्रश्न. |
५.प्रत्यावाहानात्मक
प्रश्न व प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न फरक:
१.प्रत्यावाहानात्मक प्रश्न म्हणजे आठवणे व प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न ओळखणे. २. प्रत्यावाहानात्मक प्रश्नाची रचना करणे सोपे आहे व प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्नांची रचना करणे अवघड आहे. ३. प्रत्यावाहानात्मक प्रश्नातून विद्यार्थानाच्या ज्ञान या उद्दिष्टाचे मूल्यमापन करता येते व प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्नामुळे विद्यार्थांच्या विचारला फार कमी चालना मिळते. ४. १.प्रत्यावाहानात्मक प्रश्नात रिकाम्या जागा भरा व एका वाक्यात उत्तरे द्या असे प्रश्न विचारतात व२.प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्नात व्दिपर्यायी प्रश्न,बहु पर्यायीपश्न ,जोड्या लावा ,सूचीनुसार जोड्या लावा ,अर्थाविष्कार करणारे प्रश्न : विद्यार्थांची आकलन क्षमता अजमाण्यासाठी अर्थविष्कार करणारे प्रश्न असे प्रश्न विचारता येतात. |
६.निबंधवजा
प्रश्न व वस्तुनिष्ठ
प्रश्न यातील फरक :
१. निबंधवजा प्रश्नात आपले विचार व्यक्त करण्याचा वाव असतो व वस्तुनिष्ठ प्रश्नात आपले विचार व्यक्त करण्याला वाव नसतो. २. निबंधवजा प्रश्नात पुस्तकाच्या मोठ्या भागावर प्रश्न काढत येतात व वस्तुनिष्ठ प्रश्नात पुस्तकाच्या मोठ्या भागावर प्रश्न काढता येत नाहीत. ३. निबंधवजा प्रश्नाची रचना करणे सोपे असते व वस्तुनिष्ठ प्रश्नात प्रश्नाची रचना करणे फार अवघड असते. ४. निबंधवजा प्रश्नाची प्रश्न पत्रिका छपाईच्या दृष्टीने सोपी व कमी खर्चाची असते व वस्तुनिष्ठ प्रश्न पत्रिका छपाईच्या दृष्टीने अधिक अवघड व अधिक खर्चाची आहे. ५.निबंध वजा प्रश्नाची सुधारित आवृत्ती म्हणून लघुत्तरी प्रश्न होय व वस्तुनिष्ठ प्रश्नाचे दोन प्रकार असतात एक प्रत्यावाहानात्मक प्रश्न व दुसरा प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न . |
७.मूल्यमापनाचे
गुणात्मक साधने :
१.निरीक्षण तंत्र : १.पडताळा सूची . २.पद्निश्चयन श्रेणी: वर्णनात्मक,अकांत्मक,आलेखात्मक. ३.प्रासंगिक नोंदी. ४.प्रगती पुस्तक. ५.संकलित नोंद पत्रक.
२.आत्मनिरीक्षणात्मक
तंत्र :
१.समस्या सूची. २.अभिरुची प्रश्नावली. ३.मुलाखती.
३.प्रक्षेपण
तंत्र :
१.वाक्यपूर्ती . २.गोष्ट पूर्ण करणे. ३.बाहुल्या खेळ. ४.चित्र काढणे. ५.दैनंदिनी लेखन.
४.समाजामिती
तंत्र :
१.समाजामिती आलेख . २.ओळख पाहू. १.निरीक्षणात्मक तंत्र : १.पडताळा सूची :कौशल्य प्राप्ती साठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची यादी करून त्यावरून विद्यार्थांनी कोणत्या गोष्टीत कौशल्य प्राप्त केले हे पाहणे म्हणजे पडताळा सूची होय. १.कौशल्य प्राप्त झाले असेल तर बरोबर ची खुण करणे . २.कौशल्य प्राप्त झाले नसेल तर गुणाकाराची खुण करणे . पडताळा सूचीचा नमुना विद्यार्थी प्रगट वाचन पाहणे : १.प्रगट वाचनातील घटक २.विद्यार्थांचे नाव . १.सुस्पष्ट वाचन करतो. २.आवाजात चढ-उतार करून वाचन करतो. ३.स्वरावर जोर देऊन वाचन करतो. ४.योग्य गतीत वाचन करतो. ५.कविता म्हणत असतांना लय ,कृती करतो. ६.योग्य हावभावासह वाचन करतो. कौशल्य प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबीची यादी तयार करणे म्हणजे पडताळा सूची होय.
२.पदनिश्चयन
श्रेणी : शालेय व सहशालेय उपक्रमात घेतलेल्या विद्यार्थांच्या किती सहभागी झाले हे
पाहण्यासाठी त्या उपक्रमात त्याचे
पदनिश्चित करणे.
शाळेत विविध उपक्रम होतात त्यात विद्यार्थी सहभाग पाहण्यासाठी पदनिश्चयन श्रेणी द्वारे विद्यार्थांचे मूल्यमापन करता येते. १.अंकात्मक पदनिश्चयन श्रेणी : ०,२,५,८,१० अंक मांडून पद दाखवणे . २.वर्णनात्मक पदनिश्चयन श्रेणी:विद्यार्थांच्या सहभागाच्या जागी बरोबरची खुण करणे.उपक्रमाचे नाव लिहिणे . १.उपक्रमातील सहभाग . २.विद्यार्थांचे नाव . १.विद्यार्थी कधी कधी सहभागी होतो. २.क्वचित सहभागी होतो. ३.कधी कधी सहभागी होतो. ४.अनेक वेळा सहभागी होतो. ५.नेहमी सहभागी होतो. ३.आलेखात्मक पदनिश्चयन श्रेणी : कधीनाही ,क्वचित,कधी कधी,अनेकवेळा,नेहमी.
३.प्रासंगिक
नोंदी : विशिष्ट प्रसंगाने घेतलेल्या नोंदीला प्रसंगीक नोंदी घेतल्या जातात
त्याला प्रासंगिक नोंदी म्हणतात.
१.विद्यार्थांच्या वर्तनाच्या नोंदीला प्रसंगी नोंदी म्हणतात. २.प्रासंगिक नोंदीत विद्यार्थांचे नाव ,दिनांक ,वर्ग ,स्थळ,लिहावे. ३.दैनंदिन व्यवहारातील नोंद घेवू नये. ४.नोंदी आटोपशीर व अर्थपूर्ण असाव्यात.
४.प्रगती
पुस्तक :
१.प्रगती पत्रक म्हणजे विद्यार्थांच्या वर्तनाचा स्पष्ट व स्वच्छ् प्रतिबिंब दाखविणारा आरसा आहे. २.प्रगती पत्रकात विद्यार्थांच्या वर्तनातील सर्व गुणात्मक मूल्यमापन व संख्यात्मक मूल्यमापन यांची पूर्ण माहिती श्रेणीच्या स्वरुपात तयार केली जाते. ३.प्रगती पत्रकामुळे पालकांना आपल्या पाल्याची प्रगती कळते. ४.विद्यार्थांना ही आपण पुढे काय करावे यांची माहिती मिळते. ५.शिक्षकांजवळ विद्यार्थांच्या सर्व गुणांचा पुरावा असतो .
५.संकलित
नोंदपत्रक :
विद्यार्थांच्या प्रगती पुस्तकातून सर्व गुणाच्या नोंदी फक्त श्रेणीच्या स्वरुपात दाखवणे म्हणजे संकलित नोंद्पत्रक होय.हे विद्यार्थांना वर्षाच्या शेवटी देण्यात येते.
२.आत्म
निरीक्षणात्मक तंत्र:
१.समस्या सूची : विद्यार्थांचे अडथळे ,समस्या जाणून घेण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी शिक्षकाने तयार केलेली सूची म्हणजे समस्या सूची. अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी समस्या सूची तयार करणे: समस्या असलेल्या चौकटीत बरोबरची खुण करावी: १.अभ्यासातील अडचणी २.समस्यांची खुण. १.लवकर जेवण मिळत नाही. २.शाळा खूप दूर आहे. ३.घरात सतत गोंधळ असतो. ४.शेजारी मोठ्याने टेप लावतात. ५.मित्रा बरोबर खेळल्यामुळे वेळ मिळत नाही. ६.पुस्तक नाहीत. ७.वाचन करायची पद्धत समजली नाही. ८.घरी सतत काम सांगतात. ९.अभ्यासात मन लागत नाही.
२.अभिरुची
प्रश्नावली : विद्यार्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी तयार केलेली सूची म्हणजे अभिरुची
प्रश्नावली.विद्यार्थाबद्द्ल प्रतिसाद
१.होय. बरोबर खुण, २.नाही. गुणाकार खुण ३.सांगता येत नाही.शून्य खुण करणे . विद्यार्थांना कोणत्या गोष्टी आवडतात यांची अभिरुची प्रश्नावली खालील प्रमाणे : १.विद्यार्थांना आवडणाऱ्या गोष्टी २. होय. ३.नाही . ४. सांगता येत नाही. १.गोष्ट सांगणे आवडते. २.पाठांतर करणे आवडते. ३.भेंड्या ,अंताक्षरी आवडते,खेळ आवडतात.. ४.चित्र काढणे आवडते.
३.मुलाखत
व मुलाखतीचे प्रकार :
मुलाखत :एखाद्या व्यक्तीला समक्ष भेटून प्रश्नोत्तर द्वारे त्याच्या व्यवसाय संबंधी माहिती विचारणे म्हणजे मुलाखत होय. १.प्रस्तावना :दिलखुलास पणे मुलाखत घेणे. २.मध्य : त्यांच्या व्यवसायविषयी माहिती विचारणे . ३.शेवट :मुलाखत घेणाऱ्यात समजूतदार पणा आवश्यक आहे. मुलाखतीचे प्रकार : १.अनौपचारिक मुलाखत : शाळेत प्रात्यक्षिक साठी घेतलेली मुलाखत. २.औपचारिक मुलाखत : नोकरीसाठी देण्यात येणारी मुलाखत.
४.प्रक्षेपण
तंत्र:
विद्यार्थांच्या अंतरंगाचा शोध घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राला प्रक्षेपण तंत्र म्हणतात. १.वाक्यपुर्ती :शाळेतून घरी गेल्यावर मी .............. २.गोष्ट पूर्ण करा: एक मुलगा आहे तो ............... ३.बाहुल्या खेळ : भातुकलीच्या खेळातून आई वडिलांच्या भावना मांडतात. ४.चित्र काढणे : रोशार्क चित्रात २० चित्रे असतात. त्यात शाईचा डागाणे चित्र कडून त्यातून विद्यार्थांना त्याच्या भावना कल्पना जाणून घेता येते. ५.दैनंदिनी : मुलांना रोज दैनंदिनी लिहिण्यास देणे.
५.समाजामिती
तंत्र : १९४२ साली मोरेंनी नाव दिले . १९४७ साली त्यात बदल करून जेकीन्स ने नाम
निदर्शन तंत्र नाव दिले
१.समाजमिती आलेख काढून विद्यार्थांच्या सामाजिक संबंध जाणून घेता येतात. २.ओळखा पाहू या : शिक्षक विद्यार्थांना विधाने देतात. विद्यार्थी उत्तरे लिहितात: १.वर्गात सतत अभ्यास करणारा .......... ..आहे. २.वर्गात सतत झोपणारा ........................आहे. ३.वर्गात दुपारी पळून जाणारा ....................आहे. ४.शाळेत सतत गैर हजर राहणारा ...................आहे. ५.वर्गात इतर मुलांना मारणारा ......................आहे. |
८.क्षमताधिष्टीत
अध्यापनशिवाय मूल्यमापन करणे निर्थक आहे:
१.विद्यार्थात निर्माण होणाऱ्या क्षमताची जाणीव ठेवून केलेले अध्यापन म्हणजे क्षमाताधिष्टीत अध्यापन होय. २.किमान अध्ययन क्षमता ह्या शैक्षणिक वर्ष पूर्ण होई पर्यंत पूर्ण व्हावे अशी अपेक्षा असते. ३.क्षमता प्राप्त करण्यासाठी क्षमता धिष्टीत चाचण्याचा,इतर मूल्यमापन तंत्राचा उपयोग करण्यात यावा. ४.क्षमाताधिष्टीत अध्यापन केल्यावरच क्षमाताधिष्टीत मूल्यमापन करता येऊ शकते म्हणूनच क्षमाताधिष्टीत अध्यापन शिवाय मूल्यमापन करणे निरर्थक आहे असे म्हणतात. |
Subscribe to:
Posts (Atom)